सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चर्चेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ फेब्रुवारी व तीच मुक्रर झाली. तोच हा राष्ट्रीय विज्ञान दिन.
आज 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा होत आहे. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते - भारतरत्न सर सी. व्ही. रामन यांनी 'रामन इफेक्ट' हा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. विज्ञानदिनाच्या निमित्ताने अधोरेखित केलेले 'रामन इफेक्ट' ह्या संशोधनाचे आणि रामन यांच्या व्यक्तित्त्वाचे पैलू...
भारतासाठी पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ-संशोधक म्हणजे भारतरत्न सर - चंदशेखर व्यंकट रामन! भौतिकशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा -
प्रकाशाच्या विकिरणासंबंधी संशोधन करणारे - आणि ह्याविषयीचा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जागतिक पातळीवर सादर करणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ! २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी सर सी. व्ही. रामन ह्यांनी हा शोधनिबंध जगासमोर मांडला आणि त्याला १९३०मध्ये मान्यता मिळून, भौतिकशास्त्राचा अत्यंत मानाचा नोबेल पुरस्कार त्यांना १९३०मध्ये प्राप्त झाला.
२८ फेब्रुवारी या दिनाचे वैज्ञानिक औचित्य साधून १९८७ पासून, भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. म्हणजेच साधारण श्री. रामन यांच्या जन्मशताब्दीच्या आसपास! रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला होता. अत्यंत तल्लख बुद्धीच्या - रामन यांनी वयाच्या ११व्या वषीर्च शालेय शिक्षण संपवून, १५व्या वषीर् ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले तर १७व्या वषीर्च फिजिक्समध्ये पदव्युत्तर शिक्षणही - मदासमध्ये - उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले. त्यानंतर कोलकाता येथे डेप्युटी अकौटंट जनरल पदावर रुजू झाले, पण या रुक्ष नोकरीमध्ये त्यांचे मन रमेना, म्हणून कोलकाता येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून - कमी पगारात - नोकरीत रुजू झाले. १९२१मध्ये कलकत्ता विद्यापीठातफेर् त्यांना ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. यावेळी त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये 'भारतीय तंतूवाद्ये' हा शोधनिबंध सादर केला. पुढे १९३५मध्ये 'भारतीय चर्मवाद्ये' विशेष करून तबल्याच्या नादनिमिर्ती, तबल्याची पुडी, शाई, तरंगलांबी इत्यादींवर संशोधन केले.
युरोपातून समुदमागेर् भारतात परत येत असताना आकाशातील निळ्या रंगाने त्यांचे कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचे का दिसते? अशा प्रश्नामधून त्यांचे संशोधन सुरू झाले. व त्यामधूनच त्यांनी भारतात परत आल्यावर - पाणी, बर्फ यांमधून प्रकाशाचे विकिरण (स्कॅटरिंग) यावर संशोधन सुरू केले. व यातूनच त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाची उत्तरे मिळाली!
रामन इफेक्ट म्हणजे एक प्रकारचे प्रकाशाचे विकिरणच! प्रकाशाचे विकिरण हा एक दृश्य परिणाम आहे. अशा प्रकाशाचे किरण सरळ - जेव्हा आपल्या डोळ्यांत शिरतात, तेव्हाच आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वाची जाणीव होते. रामन हे सुरुवातीला स्फटिकांच्या अणुरचनेसंबंधी आढळणाऱ्या रचना सार्धम्याशी अपवादात्मक असा अभ्यास करत होते. या दरम्यान १९२८मध्ये त्यांना असे आढळले की, विकिरीत प्रकाशामध्ये मूळ प्रकाशाइतक्या, तरंगलांबीच्या किरणांबरोबर इतरही प्रकाशकिरणांचे अस्तित्व असते, ज्यांचा मागमूसही मूळ प्रकाशकिरणांमध्ये नव्हता. या नवीन किरणांचा जास्त अचूक अभ्यास करण्यासाठी त्यांनी - पाऱ्याच्या विद्युतदीपाघटापासून मिळणारी तरंगलांबी अभ्यासली. आणि त्यातूनच त्यांच्या नवीन निष्कर्षाला, संशोधनाला बळकटी आली. प्रकाशामध्ये कण स्वरूपाशी सार्धम्य सांगणारे काही गुणधर्म असतात, त्याच्या प्रकाश कणिकांमधील ऊर्जा ही त्या प्रकाशाच्या कंपनसंख्येच्या समप्रमाणात असते. रामन इफेक्टच्या या शोधामुळे - आश्चर्यकारक अशा लपलेल्या या वर्णरेषा - मूळ प्रकाशाच्या वर्णरेषेबरोबरच ओढून बाहेर काढल्या जातात आणि दृश्यमान होतात.
या अत्यंत मौलिक, अनमोल अशा संशोधनामुळे - विकिरणाच्या आण्विक प्रक्रियेसंबंधीचे, रचनेसंबंधीचे माहितीचे भांडारच खुले झाले, व त्यामुळे अणुंप्रमाणेच, रेणुंचेही रामन वर्णपट काढता येतात, आणि रेणूंची रचना, तसेच अतिनील पट्ट्यातील रेषांचाही अभ्यास करता येऊ शकतो. तसेच दव व वायुरूप पदार्थांमध्ये होणाऱ्या विकिरणाचाही अभ्यास सहजसाध्य झाला, आणि रासायनिक रेणूंची रचना समजण्यासाठी रामन परिणामाचा खूप उपयोग झाला. रामन इफेक्टच्या संशोधनानंतर केवळ दहा वर्षांमध्ये, दोन हजारहून अधिक संयुगांची रचना - रामन परिणामामुळेच - त्याच्या साह्याने निश्चित करता येणे शक्य झाले. लेसर किरणांच्या क्रांतिकारी शोधानंतर रामन इफेक्ट - हे शास्त्रज्ञांच्या हातातील एक महत्त्वपूर्ण घटक ठरले.
भारतातील १७ विद्यापीठांनी, तर जगातील ८ विद्यापीठांनी रामन यांना सन्माननीय डॉक्टरेट- फेलोशिप सन्मानपूर्वक बहाल केली. १९४३मध्ये रामन यांनी बंगलोर येथे 'रामन संशोधन संस्थे'ची स्थापना केली.
का हे विज्ञानाचे वातावरण निर्माण करायचे?
जगातल्या विकसित देशांना अशी गरज भासत नसताना भारतालाच ते का जाणवावे? पुढारलेल्या देशांना त्याची गरज भासत नाही कारण तेथे अंधश्रद्धा नाहीत असे नाही पण त्या कमी मात्र नक्कीच आहेत. तेथील लोक कार्यकारणभाव समजावून घेणारे दिसतात. पण भारतात ती परिस्थिती आणण्यासाठी आपल्याला खटपट करावी लागणार आहे. त्या प्रयत्नातील राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे आणि त्या निमित्ताने देशभर विज्ञानाचे वातावरण निर्माण करणे, लोकांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगणे हा एक प्रयत्न आहे. आज एकविसाव्या शतकातील पहिले दशक उलटून गेले असताना जगातल्या पुढारलेल्या देशांप्रमाणेच भारतातही सर्व आधुनिक गोष्टी वापरात आल्या आहेत. १२० कोटी लोकसंख्येच्या या देशातील निम्मे लोक आज मोबाईल फोन वापरत आहेत. त्यातही टच स्क्रीनसारखे मोबाईल फोन वापरणारी तरुण पिढी आहे. एवढेच नव्हे तर अंगावर फाटके कपडे असले तरी आमचे शेतकरी मुंडाशात मोबाईल फोन ठेवून असतात आणि बाजारभाव काय आहे हे आधी विचारून मगच आता आपला माल बाजारात नेऊ लागले आहेत. बाजाराला किती मालाची मागणी आहे हे अगोदर विचारून मगच वसईचा शेतकरी हवा तेवढा माल घेऊन मुंबईला जातो. लांबून येणारा कोणीही माणूस ज्याच्याकडे जायचे त्याची उपलब्धता अगोदर फोनवर ठरवून घेऊन मगच त्याच्याकडे जातो. ‘या बाजूला सहज आलो होतो, तुम्ही आहात का ते पाहावे म्हणून सहज डोकावलो’चे दिवस आता संपले.आता तर दोघा तरुण नवरा-बायकोला दिवसभर आपल्याजवळ मोबाईल हवा असल्याने घरी आता ‘लँड लाईन’ असण्याचे दिवस संपले आहेत. हे लोण आता तीन-चार वर्षांच्या मुलांपर्यंत पोहोचले असून त्याला खेळण्यातही मोबाईल फोन हवा असतो. घराघरात मिक्सर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्ट्रिक कूकर, ताक घुसळण्याची इलेक्ट्रिक रवी, रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉिशग मशीन, गिझर इत्यादी अनेक उपकरणे आली आहेत. पण ती कशी चालतात, ती किरकोळ बिघडली तर कशी दुरुस्त करायची याची तसदी आपण कोणी घेत नाही. हा प्रश्न आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाशी जोडून देऊन आपण मोकळे होतो. म्हणजे असे की आपल्याकडे सुतार, इलेक्ट्रिशियन, प्लंबर (खरा उच्चार प्लमर), रंगारी असे अनेक लोक उपलब्ध असल्याने आपण त्या गोष्टी आपल्या हाताने तर करीत नाहीच, पण त्या कशा करायच्या हेही समजावून घेत नाही. परदेशात माणसांचा एकूणच तुटवडा असल्याने तेथे बाजारात उपलब्ध असलेल्या गोष्टी घरी नेऊन लोक नट-बोल्टच्या सहाय्याने जोडतात. त्यासाठी अनेक गॅजेटबरोबर दिलेली माहितीपत्रके लोक नीट वाचून त्याप्रमाणे त्या गोष्टी जोडून चालू करतात. आपल्या येथल्यासारखे कोणी ‘डेमो’साठी येत नाहीत. डेमोसाठी कंपनीचा माणूस आला नाही तर लोक महिनोन् महिने त्या वस्तू वापरत नाहीत. वस्तुत: त्या त्या वस्तूंबरोबर माहितीपत्रक असतेच. औषधाच्या बाटलीबरोबर आलेले पत्रक आपल्यापकी किती जण वाचतात? औषध विकत घेताना त्या बाटली किंवा गोळ्यांच्या स्ट्रिपवरील ‘एक्स्पायरी डेट’ही आपण वाचत नाही. ही का आपली साक्षरता? ज्या गोष्टी आपल्या जिवाशी ‘खेळ’ करू शकतात त्याही आपण पाळत नाही.
काही ठिकाणी मात्र ग्रामीण भागातील लोक विचार करू लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेत-तळे करून पावसाचे पाणी साठवले. ते किती आहे ते पाहून आपल्याला अर्धा एकर जमिनीत कोणते पीक काढता येईल याचा हिशेब करून त्याने टोमॅटो लावला आणि त्यातून ४० हजार रुपये मिळवले. मात्र येथे आणखी एक धोका जाणवतो, तो असा की एकाला टोमॅटोमधून बऱ्यापकी फायदा मिळाला हे पाहून बाकीचे लोकही टोमॅटो लावतात आणि गावात खूप टोमॅटो पिकल्यावर भाव मग एकदम पडतो. तसे होऊ नये म्हणून ग्रामसभेत लोकांना पिके जर वाटून दिली तर प्रत्येकाला पसा मिळेल आणि भाव पडणार नाही. काही वर्षांपूर्वी अमरावतीजवळील मेश्राम नावाच्या एका शेतकऱ्याने शेतीसाठी पाणी नाही म्हणून स्वस्थ बसण्याऐवजी गावातील सांडपाणी नगरपालिकेकडून मागून घेतले व ते संत्र्याच्या बागेसाठी वापरले. त्याला त्याच्या इतर शेतकरी मित्रांनी खूप दोष दिला की अशा घाण पाण्यावर संत्री येणार नाहीत आणि जर ती आली तर कोणी विकत घेणार नाही. पण त्या पाण्यावर संत्री खूप तजेलदार आली आणि सर्व संत्री उत्तम भाव मिळवून विकली गेली. माझी खात्री आहे की आता तेथे सांडपाण्यासाठी मारामारी होत असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील गडिहग्लजला गावातले सगळे सांडपाणी एकत्र करून त्यावर छोटीशी प्रक्रिया करुन ते पुरेल तितक्या शेतीला देतात. असे पाणी शेतकऱ्याला १२ महिने उपलब्ध होते व नगरपालिकेला त्या पाण्यातून पसाही मिळतो. बाकीच्या नगरपालिकांनी हा कित्ता गिरवल्यास महाराष्ट्रात हुकमी पाण्याखाली असलेली १६ टक्के जमीन २०-२२ टक्क्यांपर्यंत सहज जाईल व तीही बिनखर्चाने.
No comments:
Post a Comment